Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

क्षण दुधारी

May 23, 2017

Search by Tags:  कविता
काही लपवले क्षण दुधारी
आयुष्यात घेत भरारी !
उतरंडीच्या वाटेवरती
पंख थकले नुरे उभारी !!

आभाळाची अथांग सवारी
मागे जीवलग ठिपके दूरवरी !
आभासी , हाती अमृत कुपी
दुखऱ्या सली झरी आसव सरी !!

नको झुलाया धुंद मग्रुरी
काटे रूताया वीख तरूवरी !
आठवायचे मनीं सोनेरी क्षण
हुंदका लपवी वस्त्र भरजरी !!


अरुण कुलकर्णी

9890096210


Search by Tags:  कविता
Top

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 476 hits