Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हात

May 26, 2017

Search by Tags:  कविता
कोणाच्याही जवळ जावे
येऊदे त्याला कंटाळा,
चांगुलपणाने घर भराव
डबडबून वाहील डोळा !

कोण कुणाला गरज आहे
थांबू नको पहात वाट ,
नको कधी झिडकारू
मदतीसाठी आसुसला हात !!

आपुलकीचा बंध आगळा
भोवताली घट्ट विणा,
वाचायला शिकावा
साद डोळ्यातील केविलवाणा !!

नसे कष्ट , गोड बोलण्या
साद द्यावी धीराची ,
ना असावी अपेक्षा
गळ्यातल्या हाराची !!

माणुसकीचा मंत्र साधा
जीवनाचा अर्थ शोधा,
दधितीचे अस्त्र होऊनि
आयुष्याच्या लेणी खोदा!!

अरुण कुलकर्णी 9890096210
Search by Tags:  कविता
Top

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 1203 hits