Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 23, 2017
Visits : 1042

लपवितो  लाज विरविरीत  ठिगळात हुंदका दाबुनी भुकेल्या गळ्यात !मनाला शांती मण्यांच्या माळांतमन रिझवतो भजनाच्या टाळात  !!जर्मनची भांडी वीतभर पालात भुकेचा अग्नी विझतोय घोटात !हांसू दबतंयबसक्या गालातअंकुर करपे जप्तीच्या लोळांत !!सुंभ जळतो दोरीच्या पिळात नशिबाच्या रेषा बुजल्या भाळात !मोत्यांची रास ओतुनी खळ्यात आशेचं आभाळ साठवितो डोळ्यात !!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

January 20, 2017
Visits : 1742

काय घेतलीय जातपात समाजाची लावलीय वाट !द्वेषाची पेरणी विध्वंसाची वाट यांच्या कुल्ल्यावर मारा लाथ !!कुणा नेत्याचा होऊनिया भाटआकारा येई खांद्यावर माठ !कष्टाच्या  भाकरीस दाखवी पाठ मरगळली मान करतो ताठ !!विहिरीचा धरुनी काठ शांत पाण्यावर उठवी लाट !निरोची गाणी गात गात सुरंगाची पेटवी वात !!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

January 20, 2017
Visits : 1792

वर्गातल्या मुलीसाई सुट्ट्यो भुर्र गेल्या  !कोण आठवतंय कोण खंतावतयकाटा रुतुनीजखमा भळावल्या !!कधी शेंग चवळीची ऐकू बात कवळीचीश्वास लागतो जरी आठवे हवा जवळीची !!नाद किणकिण गुंजतो कानी !श्रवण करतो यंत्र लपवुनि  !!अरुण कुलकर्णी9890096210Read More

January 17, 2017
Visits : 600

फुलावाणी तुझी वाणीगोल रुंजी घाले राणीगंधाळ श्वास खेळतो कानी केवड्याची डोले नागफणी !देह कमनीय फुलदाणीडोळे तेजाळ हिरकणी शब्द , शृंगार लावणीहासू मधाळ ओल सावनीं !मदभरी मोहशी आरस्पानी नाद कंकणी गुंजे कानी तुझ्या गळा भाव गाणी धुंद फ़ुलशी रातराणी !अरुण कुलकर्णी9890096210Read More

January 10, 2017
Visits : 1876

ती च्यवनप्रश चाखते ,तरी व्याधींनी कुरकुरते ! एकटेपणा विसरुनी, नातवंडीं मन रिझवते !! पाखरावानी झुलते , तारुण्य दिस आठवते ! आरशातील प्रतिमा पाहुनी , नित्य उसासे सोडते !! लाईन लावणारा आठवून , संतापाने बोट मोडते ! शिव्याशाप धुंवाधार मनीं , त्याची ठेचाळती बोटे !!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

January 09, 2017
Visits : 2063

फुलावाचून गंध न वेगळा गीतांनी भिजे चिंब गळा ! कृष्ण भक्तीचा छंद आगळा राधा नाचे यमुना जळा !!शिल्प रेखिले निळ्या कातळा आम्रमोहर गंध कोवळा !बासुरीची धून घुमे राउळा वारा लपेटून घन सावळा !!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

January 06, 2017
Visits : 881

लोहरस  मुशीत भाता डोळे पुशीत मातीत ' गोरा ' नाचीतधनको उभा वेशीत !भक्तांच्या राशीत देवाच्या काशीत पैसा पंचक्रोशीत वाहतो खुशीत !झाडाच्या कुशीत पानांच्या उशीत जीव लुसलुशीत निजे निश्चिन्त ! अरुण कुलकर्णी9890096210Read More

January 03, 2017
Visits : 1213

पावसाचा थेम्ब उन्हास गारवा !मातीने झेलताफुलतो मारवा !!चांदव्याची तिरीप चातकाला हवी  !जगण्याचा मोर सुखबीज रुजवी  !!सरणारे वर्ष निरोप दे आनंदे !सरणावर सारेच ओझ्याचे अनामिक खांदे !!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 11209 hits